कल्याण :- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीची बैठक महापालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २७ गावांमधील सोनारपाडा व आडीवली ही दोन गाव प्राथमिक स्तरावर निवडण्यात आलीत. या गावांचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीने सांगितले. त्यामुळे या भागातील मालमत्ता करापाठोपाठ आता अनधिकृत बांधकामांचा प्रश्न देखील निकाली निघण्याची आशा निर्माण झाली आहे
कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावातील वाढीव मालमत्ता कराचे फेर मूल्यांकन व अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. या समितीची २७ गाव संघर्ष समिती पदाधिकारी ग्रामस्थासोबत मालमत्ता कर फेर मूल्यांकनाबाबत बैठका झाल्या. आज २७ गावातील अनधिकृत बांधकामासंदर्भात या समितीचे बैठक झाली. या बैठकीला संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, गंगाराम शेलार, गजानन मांगरूळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.