सांगोला : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जि. सोलापूर, ता. सांगोला, जुनोनी गावात जिल्हा परिषद शाळा, सिद्धनाथ मंदीर येथे दि. ५ फेब्रुवारी २०२४ रोजी वैद्यकीय निसर्गोपचार शिबीराचेआयोजन करण्यात आले. या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
शिबीराचे उद्घाटन डॉक्टर कांबळे,डॉक्टर राहुल, डॉक्टर कोरे यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन प्रसंगी डॉक्टरांकडूनबाळासाहेब ठाकरे यांच्या तसबीरीला हार घालण्यात आला व नारळ फोडून निसर्गोपचार शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) सांगोला उप तालुका प्रमुख अरविंद पाटील, बाळासाहेब चोररमुले, सचिन पाटील, मच्छिंद्र तंडे, अण्णा सो बंडकरदादासो होनमाने, सलीम मुलानी, पिनू शेटे, शिवाजी मदने, प्रभाकर हंकारे, रमेश हंकारे हिरण्मयी निसर्गोपचार केंद्राच्या संचालिका व तज्ज्ञ डॉक्टर पूर्णिमा हंकारे यांच्या उपस्थितीत वैद्यकीय निसर्गोपचार शिबीर पार पडले.
निसर्गोपचार शिबीरासाठी उपस्थित असणार्या २२-२५ महिला व पुरुषांवर त्यांच्या व्याधींच्या अनुषंगाने निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर पूर्णिमा हंकारे यांच्याकडून उपचार करण्यात आले. सदर शिबीरासाठी ७०-७२ महिला व पुरुषांनी उपचारासाठी नोव नोंद केली होती. शिबीर सकाळी ११ वाजता सुरू होऊन सायंकाळी ६.०० वाजता सांगता झाली. वैद्यकीय निसर्गोपचार शिबीरासाठी फारच चांगला प्रतिसाद मिळाल्याने हिरण्मयी निसर्गोप चार केंद्रातर्फे प्रभाकर हंकारे व रमेश हंकारे यांच्यावतीने आभार मानण्यात आले.