एमसीएचआय कल्याण डोंबिवलीच्या अध्यक्षपदी श्रीकांत शितोळे तर सचिवपदी विकास जैन
कल्याण ( प्रतिनिधी ) : बांधकाम व्यावसायिकांची अग्रगण्य संस्था असणाऱ्या क्रेडाई-एमसीएचआय कल्याण डोंबिवली अध्यक्षपदी श्रीकांत शितोळे यांची तर सचिवपदी विकास जैन यांची निवड करण्यात आली. आताच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये दिपक मेहता यांनी अध्यक्षस्थान तर मिलिंद चव्हाण यांनी सचिवपद भूषविले होते.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एमसीएचआयची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्वानुमते या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती बांधकाम व्यावसायिक रवी पाटील यांनी दिली. श्रीकांत शितोळे आणि विकास जैन यांची नियुक्ती पुढील वर्षासाठी म्हणजेच 2020 -2021 या एक वर्षाच्या कार्यकाळासाठी असणार आहे. मावळते अध्यक्ष दिपक मेहता आणि मिलिंद चव्हाण यांनी गेल्या वर्षभरात चांगले काम केल्याची भावना यावेळी सदस्यांनी व्यक्त केली. दरम्यान पदाधिकारी निवडीबरोबरच कोरोनामुळे बांधकाम क्षेत्राला बसलेला फटका, व्यवसायावर झालेले परिणाम आणि भविष्यातील बांधकाम व्यवसायाची स्थिती यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचेही रवी पाटील यांनी सांगितले. तर सध्या केवळ अध्यक्ष आणि सचिव पदाचीच निवड करण्यात आली असून उर्वरित कार्यकारिणी सदस्यांची निवडही येत्या कालावधीत होणार असल्याचे संगण्यात आले.
**