मायावतींचा उत्तराधिकारी आकाश आनंद

१० डिसेंबर लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी आज (१० डिसेंबर) लखनौमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसपाच्या या बैठकीत मायावतींनी उत्तराधिकारी आकाश आनंद असेल, अशी घोषणा केली आहे. या बैठकीसाठी मायावतींनी पक्षाच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकार्‍यांना आणि राज्यांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना बोलावले आहे.

आकाश आनंद हा मायावतींचा धाकटा भाऊ आनंद कुमार यांचा मुलगा आहे. मायावती आकाश आनंद यांच्यासोबत बैठकीला पोहोचल्या होत्या. अलीकडेच बसपनेआकाश आनंद यांच्याकडे चार राज्यांची जबाबदारी सोपवली होती. गेल्या ६ वर्षांत आकाश यांची पक्षातील सक्रियता वाढत आहे. सुरूवातीला मायावतींनी आकाशची त्यांच्यासोबत व्यासपीठावर ओळख करून दिली होती. मायावतींनी आकाश आनंद यांना पक्ष समन्वयकासारखे महत्त्वाचे पद दिले होते. आकाश यांनी इतर राज्यात संघटनेच्या बैठका घेतल्या होत्या. आकाश आनंद यांचे शालेय शिक्षण गुडगावमध्ये झाले, तर पुढील शिक्षण लंडनमध्ये केले. लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) केलं आहे.

त्यांचा राजकारणात प्रवेश २०१७ मध्ये झाला होता, जेव्हा ते सहारनपूरच्या सभेत पहिल्यांदा मायावतींसोबत स्टेजवर दिसले होते. आकाश सध्या पक्षाचा राष्ट्रीय समन्वयक आहेत. आकाश आनंदच्या राजकीय प्रवासाविषयी सांगायचं झाल्यास त्यांनी २०१७ मध्ये राजकारणात प्रवेश केला. मायावतींनी २०१७ मध्ये एक मोठी सभा घेऊन आकाश आनंद यांना राजकारणात आणले होते. मायावतींनी आपल्या भाच्याला उत्तराधिकारी म्हणून घोषित करताच आकाश आनंद यांच्या संघटनात्मक क्षमतेबाबत राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. बसपाने अनुभवी नेत्यांकडे दुर्लक्ष करून तरुण चेहर्‍यावर बाजी का मारली? याबाबत अद्याप कोणतीही राजकीय प्रतिक्रिया आलेली नाही. पण त्यामागचा हेतू स्पष्टपणे दिसतोय की, मायावतींना आकाश आनंदच्या रुपातून भविष्यातील राजकारणाकडे पाहत आहेत.

जेणेकरून त्यांना निवडणुकीतील डावपेच, तिकीट वाटप, निवडणूक प्रचार आणि इतर बाबींचा अनुभव घेता येईल. दुसरीकडे, यूपीमध्ये आकाश लॉन्च झाल्यानंतर बसपा सतत कमकुवत होत चालली आहे. २०१७ आणि २०१९ मध्ये पक्षाचा मोठा पराभव झाला, तर २०२२ च्या यूपी निवडणुकीत बसपा फक्त एका जागेवर मर्यादित राहिला. ज्या राज्यांमध्ये पक्षाची मुळे जुनी आणि खोल असली तरी तितकी मजबूत नसलेल्या राज्यांमध्ये बसपच्या कामगिरीत मोठी घसरण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!