माथेरान वनसंवर्धन समितीत वर्णी लावण्यासाठी जोरदार फिल्डींग 

समितीत दडलय तरी काय, : माथेरानवासियांचा सवाल 

कर्जत. (राहुल देशमुख):  माथेरान वनविभाग संलग्न वनसंवर्धन समितीची कालमर्यादा संपल्यानंतर आता नवीन कमिटी गठीत करण्यात येणार आहे. मात्र समितीत वर्णी लागावी यासाठी जोरदार फिल्डींग लागली असून राजकीय दबावही वाढत असल्याचे चित्र दिसून येतय. त्यामुळे वन विभाग अधिका-यांची चांगलीच कोंडी झालीय. या समितीत महिलांनाही आरक्षणाप्रमाणे प्राधान्य द्यावे लागणार आहे. मात्र या कमिटीचा सदस्य होण्यासाठी इतका आटापिटा का केला जाताेय, एवढ या समितीत  काय दडलय, असा सवाल आता माथेरानवासियांना पडलाय.

वनसंवर्धन समितीची मान्यता हि ग्रामसभेतून केली जाते ग्रामसभेमधील सभासद  येथे जातात व त्याचा ठराव करून हि यादीपुढे वनविभागाला कळविली जाते त्यामध्ये सरकारी नियमानुसार आरक्षणही जपले जाते .माथेरान येथील सध्या अस्तित्वात असलेल्या समितीची कालमर्यादा संपल्याने नवीन समिती गठीत करण्यात येत आहे त्याचे सर्व अधिकार येथील नगरपालिकेकडे आहेत व त्यानुसार त्यांनी प्राथमिक यादी वनविभागाकडे पाठविली आहे प्रत्यक्षात ह्या समितीमध्ये १२ किंवा २४ सदस्य मर्यादा असताना २७ जणांची यादी वनविभागाकडे असून पन्नास टक्के  आरक्षण असताना देखील  तीनच महिलांना स्थान देण्यात आले आहे  त्यामुळेच  वनविभाग कार्यालयात झालेल्या सभेमध्ये हि कमिटी गठीत होऊ शकली नाही. केवळ  अध्यक्ष व दोन उपाध्यक्ष यांची निवड पक्की समजली जात असली तरी सत्तावीस मधून तीन नावे जाणार आहेत  व महिलांना प्राधान्य दिल्यास पुरुष सदस्यापैकी कोणाला डच्चू दिला जाणार असाही प्रश्न समोर येत आहे. माथेरान मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वनसंवर्धन समिती गठीत आहे व प्रत्येक पाच वर्षांनंतर नवीन समिती गठीत केली जाते पण यावेळेस समितीमध्ये सभासद  होण्यासाठी प्रथमच प्रतिष्टेचा प्रश्न केला जात असल्याचे दिसून येतय अनेकजण आपलीच वर्णी लागावी म्हणून सगळी ताकद पणाला लावताना दिसत आहेत. वनविभाग अधिकारी मात्र पेचात पडल्यासारखे दिसत असून समिती गठीत करताना प्रचंड राजकीय दबावात असल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे वन विभाग कार्यालयात नवीन समितीची दुसरी बैठक पार  पडली असून अजून समितीचे सभासदच निश्चित झाले नसल्याने या बैठकीकिंचे प्रयोजन काय होते असा प्रश्न येथील नागरिकांना पडलाय. या समितीमध्ये सभासद होण्यासाठी इतकी धावपळ का ?ह्यामागे दडलंय काय ? असा प्रश्न येथील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!