माथेरानमधील बांधकामे नियमित करा : नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकड

माथेरान: राज्य शासनाने नगरपालिका /महानगरपालिका क्षेत्रांतील २०१५ पर्यंतची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची घोषणा केलेली आहे त्याच धर्तीवर माथेरानमधील २०१५ पर्यंतची बांधकामे सुद्धा अधिकृत करावी अशी लेखी मागणी नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्या कडे केलीय.

माथेरानमधील बहुतांश मालमत्ता हेरिटेज असून १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथील सर्वच मालमत्ता शासन जमा आहे.या मालमत्ता शासनाने भाडेतत्वावर संबंधितांना विविध कारणास्तव वापरण्याकरीता तसेच देखभाल व दुरुस्ती कामी दिलेल्या आहेत.माथेरान नियमावली १९५९ नुसार येथे २५६ माथेरान भूखंड (बी.पी.प्लॉट ) अस्तित्वात आहेत. त्यानंतर २५४ एम.पी.भूखंड आहेत.सदरच्या भूखंडांपेक्षा कोणत्याही प्रकारची यामध्ये वाढ झालेली नाही.माथेरान भुखंडाचे आकारमान /क्षेत्रफळ मोठे असून त्यामानाने बाजार भुखंडाचे आकारमान /क्षेत्रफळ फारच अत्यल्प आहे.सर्वसाधारपणे बाजार वस्तीत असणाऱ्या दाट वस्तीत २५४ भूखंड असून १९०५ पासुनच या स्थळावर वास्तव्यास आहेत. दरवर्षी लोकसंख्येमुळेच कुटुंब वाढत आहेत.त्याप्रमाणात गावठान हद्द व त्यांच्या सीमा वाढतात.घरांची संख्या साधण्यासाठी घरांची निर्मिती करता येते.परंतु येथील सर्वच मालमत्ता व जमीन हद्द वाढलेली नाही.इथे कोणत्याही प्रकारे औद्योगिक उद्योग ,व्यवसाय नाही.संपूर्ण भाग बिनशेतीचा आहे.पर्यायाने असलेल्या केवळ २५४ भुखंडामध्ये स्थानिक मंडळी वास्तव्यास असून पूर्वी जर एखाद्या घराच्या लगत असलेल्या मोकळ्या जागेत किरकोळ स्वरूपाचे बांधकाम करून निवासाची सोय करून लोक राहू लागले आहेत.व्यवसायाचे दुय्यम कोणतेही पर्याय नसल्याने पर्यटन हाच एकमेव व्यवसाय असल्याने न्याहारी व निवारा या धर्तीवर घरांची निर्मिती पर्यायाने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी होऊ लागली आहे.त्यामुळे शासनाने ही सर्वच घरे अनधिकृत समजू नयेत असे नगराध्यक्ष सावंत यांनी सांगितलं सध्याची अस्तित्वात असलेली २०१५ पर्यंतची सर्वच बांधकामे अधिकृत करण्यासाठी नगरपालिकेने ठराव पारित केलाय.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!