आदिवासीचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
डोंबिवली: लायन्स क्लब ऑफ डोंबिवली तर्फे दरवर्षी पालघर जिल्ह्यातील तलासरी या ग्रामीण भागात “आदिवासी सामूहिक विवाह सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. आजपर्यंत ५०० हुन अधिक जोडप्यांचे विवाह लावून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर सक्षमरित्या उभे केले आहे.
यंदाचे वर्ष या उपक्रमाचे “दशकपूर्ती वर्ष” होते. प्रसिद्ध उद्योजक आणि समाजभूषण एम.जे.एफ. लायन मधुकर चक्रदेव* यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम सुरु झाला. सातत्याने दरवर्षी हा सोहळा दिमाखदार स्वरूपात पार पडत आला असून आजपर्यंत ५०० हुन अधिक जोडप्यांचे विवाह लावून देऊन त्यांना स्वतःच्या पायावर सक्षम रित्या उभे केले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही एकूण ५१ पेक्षा जास्त आदिवासी जोडप्यांचा लग्न समारंभ तलासरी येथे पार पडला. फक्त विवाह लावून न देता, जोडप्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व नवविवाहित जोडप्यांना पुढील संसारासाठी लागणारी सर्व गृहउपयोगी सामग्रीदेखील क्लबतर्फे भेट म्हणून देण्यात आली. लग्नातील सर्व विधी, सर्व सामग्री, शास्त्रोक्त पद्धतीने कार्यक्रमाची आखणी, सर्व जोडप्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती, आणि अन्य मान्यवरांच्या साक्षीने हा सोहळा अत्यंत चांगल्या रीतीने संपन्न झाला.
विनोद ओरपे, परणाद मोकाशी, माधव साने, सुधीर काळे, आनंद डीचोलकर, महेन्द्र मोकशी, सपना सिंग , रुपाली डोके , महेंद्र संचेती, मधुकर वाणी, अमोल पोतदार, सौरभ मोकाशी, श्रीकांत डोके , अशोक प्रजापती, नित्यानंद पवार, संजय पवार, अशोक नालावडे, अरुण चिंचोळे… असे जवळपास सर्वच लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीच्या सभासदांचा कार्यक्रमात सक्रीय सहभाग होता.
डिस्ट्रिक्ट, रिजन व झोनमधील सर्व लायन्स क्लब व त्याचे पदाधिकरी आणि सदस्य, वनवासी कल्याण केंद्र – तलासरी चे सर्व पदाधिकारी, सर्व प्रायोजक, हितचिंतक, आदिवासी जोडपी व त्यांचे कुटुंबीय, अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत, *लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीच्या सर्व सदस्यांच्या परिश्रमाने आणि मधुकर चक्रदेव यांच्या कुशल नेतृत्वाने या वर्षीचा आदिवासी सामूहिक विवाह सोहळा” यशस्वी रीत्या संपन्न झाला.