मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी येत्या २० जानेवारीला लाखो समाज बांधवांसह मुंबईला जाण्याचा निर्णय आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. आंतरवालीतून मुंबईकडे पायी मोर्चा निघणार आहे त्या मोर्चेचा मार्गही त्यांनी जाहीर केला. शेतीचे कामे आवरुन घ्या, सण, उत्सव, लग्न समारंभ बाजूला ठेवा आणि मराठा आरक्षणासाठी तुमच्या पुढील पिढीसाठी आंदोलनात सहभाग व्हा असे आवाहन मनोज जरांगे पाटील आवाहन केले.
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने दिलेली २४ डिसेंबरची मुदत संपल्याने जरांगे पाटील यांनी मुंबईच्या मोर्चेची घोषणा केली. या मोर्चाचा मार्ग सांगताना ते म्हणाले की, आंतरवली सराटी अहमदनगर वाशी मार्गे मुंबईत पायी दिंडी प्रवेश करणार आहे. आंतरवलीतून निघालेला पायी मोर्चा थेट मुंबईत धडकणार आहे. शनिवारी मराठा मोर्चा आंतरवलीतून निघाल्यानंतर तो मार्गावरील विविध गावातून जाणार आहे. ज्या मार्गाने मोर्चा जाणार आहे. त्या गावांना मोर्चेकरांना सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी राज्यात ५४ लाख मराठा नोंदी सापडल्याचेही सांगितले. ही संख्या कमी नाही. आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असा ठाम निर्धार मनोज पाटील यांनी व्यक्त केला. एकदा बाहरे पडलो तर आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही असे त्यांनी सांगितले.
या आंदोलना सामील होणा-यांनी वापरासाठी लागत असलेल्या वस्तू सोबत घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यासाठी एका वाहनातून मीठ मिरची तेल ५० किलो बाजरी पीठ ५० किलो गव्हाचे पीठ ५० किलो तांदुळ छोटी चूल पाण्याचे ड्रम टँकर सोबत घ्यावी जेथे थांबाल तेथेच आपला स्वयंपाक करून खायचा आहे. भजन मंडळ, टाळकरी, हलगी पथक, शिवशाहीर, जागरण गोंधळ करणारे, भरुडकार यांनी मनोबल वाढविण्यासाठी यावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
असा आहे मोर्चेचा मार्ग …
आंतरवली सराटी, शहागड, गेवराई, खरवंडी, पाथर्डी अहमदनगर, सुपा शिरूर, रांजणगाव, वाघोली, लोणावळा, पनवेल, वाशी चेंबूर, आझाद मैदान, शिवाजी पार्क