काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरण : मनसैनिकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी अटकेत असलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या आठ कार्यकत्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.  1 डिसेंबर रोजी आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी संदीप देशपांडे संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिले, विशाल कोकणे, हरिश सोळंकी, दिवाकर पडवळ यांना अटक करण्यात आलीय. मुंबईतील किला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसाची पोलीस कोठडी दिलीय. या सगळ्यांच्या जामीन अर्जावर येत्या बुधवारी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!