डोंबिवली :- दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला डोंबिवली मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव प्रवीण पाटील आहे.घटनेनंतर प्रवीण पसार झाला होता . प्रवीण पाटील त्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथक तयार करून नाशिक येथील सटाणा तालुक्यातून त्याला अटक केली आहे

डोंबिवली मधील सांगाव परिसरात 12 वर्षीय मुली इमारती जवळ उभ्या असताना या मुलींना पाहून आरोपी प्रवीण पाटील अश्लील हावभाव केले होते. तरुणाचे हे कृत्य बघून अल्पवयीन मुलींनी आरडाओरडा सुरू केला. मुलींच्या आरडाओरडा सुरू झाल्यानंतर प्रवीण पाटील नावाचा हा तरुण तिथून पळून गेला. घडलेला प्रकार अल्पवयीन मुलींनी आपल्या नातेवाईकांना सांगितला .या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रवीण पाटील यांच्या शोधण्यासाठी मानपाडा पोलिसांनी दोन पथक तयार केली . प्रवीण पाटीलच्या शोधात पोलीस अनेक ठिकाणी गेले. मात्र तो सापडला नाही. अखेर 14 दिवसानंतर त्याला मानपाडा पोलिसांनी नाशिक येथील सटाणा तालुक्यातून अटक केली आहे. या प्रकरणाच्या पोलीस तपास करीत आहेत. मात्र या घटनेमुळे डोंबिवली एकच खळबळ उडाली आहे .बदलापूर अत्याचार घटनेनंतर अंबरनाथ शहरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. आता डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलींसोबत घडलेला प्रकारानंतर प्रवीण पाटील या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!