जामनेर /विशेष प्रतिनिधी : मराठा समाजाच्या आरक्षणार्थ संपूर्ण महाराष्ट्रात जनजागरण करून आरक्षणाला मराठा समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी जनजागरण करत असलेले समाजाचे तरूण तडफदार नेते मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. याचाच एक भाग म्हणून जळगाव येथे रविवार ३ डिसेंबर सायंकाळी सभा सभा होणार असून दिनांक ४ डिसेंबर रोजी ते जामनेर मार्गे भुसावळ ,मुक्ताईनगर असा रोड शो आणि रॅली काढणार आहेत.

जामनेर येथे मनोज जरांगे पाटील यांची भव्य दिव्य रॅली होणार असून सकाळी दहा वाजता जामनेर शहरात त्यांचे आगमन होईल. जामनेर तालुक्यातील नेरी, चिंचखेडे, केकत निंभोरा, पळासखेडे येथे त्यांच्या भव्य दिव्य स्वागताची तयारी करण्यात येणार आहे. तसेच जामनेर येथे सकाळी दहा वाजता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जामनेर शहरातील आणि जामनेर तालुक्यातील सखल मराठा समाजाने या भव्य आणि दिव्य रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन मराठा आरक्षण कृती समितीने केले आहे. जामनेर मधील त्यांचा रोड शो आणि भव्य रॅली आटोपल्यानंतर ते भुसावळ कडे प्रयाण करतील.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथून रणशिंग फुंकणारे समाज भूषण मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळेला उपोषण केले.आपल्या मागणीच्या समर्थनार्थ ते संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करत आहे. या दौऱ्यात ते उत्तर महाराष्ट्रातून विदर्भात प्रवेश करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे जामनेर शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वागत करण्यात येणार आहे. या रॅली आणि रोड शो मध्ये मराठा समाजातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाज जामनेर शहर आणि जामनेर तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठा समाजाचे आरक्षण हे अंतिम टप्प्यात आले असून 24 डिसेंबर ही अंतिम तारीख महाराष्ट्र सरकारला देण्यात आली आहे. यासाठीच श्री मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात समाज बांधवांना आपली भूमिका समजावून सांगत आहे. मराठा समाजाने त्यांना अगोदरच पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा दिला असून कोणत्याही ओबीसी जमातीवर अन्याय होणार नाही हा संदेश ते संपूर्ण राज्यात पोहोचवण्यासाठी आपला दौरा करत आहे. याचाच एक भाग म्हणून ते सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता जामनेर शहरात येणार आहेत.

जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाज असून या कार्यक्रमाला समाजातील सर्व धुरंधर व्यक्तींनी आणि हितचिंतकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या स्वागतासाठी जळगाव रोड वरील पळासखेडे येथून भव्य दिव्य मोटार सायकल रॅली द्वारा स्वागत करण्यात येणार असून जामनेर तालुक्याच्या वतीने भुसावळ रोडवरील गारखेडे येथे निरोप देण्यात येईल.सकल मराठा समाज बांधवांनी आणि तरुणांनी या कार्यक्रमासाठी मोटारसायकलीने उपस्थित रहावे आणि मोटार सायकल रॅली त्यांचे स्वागत आणि निरोप द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
़़़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *