कल्याण– मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज कल्याण डोंबिवलीत जाहीर सभा पार पडली त्या जाहीर सभेनंतर जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना भुजबळांवर टीका केली भुजबळांना संताजी धनाजी सारखा आता सगळ्या ठिकाणी मीच दिसतोय असा टोला जरांगे पाटील यांनी भुजबळांना लगावला.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की त्यांना वैयक्तिक विरोध नव्हता, वैचारिक विरोध होता. मात्र सुरुवात त्यांनी केली. मराठा आरक्षणाला विरोध करण्याची गरज नव्हती. त्यामुळे आता त्यांच्यावर टीका करणार असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनावेळी गोळीबाराच्या घटनेनंतर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली आहे या पत्रकाराने विचारलेला प्रश्नाला उत्तर देताना तरंगे पाटील म्हणाले की मारल्याचे त्यांना बक्षीस मिळाले असेल .निष्पाप जनतेवर कट रचून ज्यांनी हल्ला केला त्यांना बढती मिळणार असेल तर याची माहिती घेईन .त्याच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे.मात्र यातून कोणालाही सुट्टी मिळणार नाही अशी प्रतिक्रिया दोषी यांच्या बदलीनंतर मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे. ते कल्याण मधील जाहीर सभेनंतर पत्रकारांशी बोलत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोणीतरी आहे असं वक्तव्य केलं होतं.त्याला आता मनोज जरांगे पाटलांनी प्रतिउत्तर दिलंय. माझ्या पाठीमागे कोणीतरी आहे हे राज ठाकरेंचं म्हणणं बरोबर आहे. माझ्यामागे सामान्य मराठ्यांची शक्ती आहे. स्क्रिप्ट वगैरे मी वाचत नसतो वाचून माणूस एवढा बोलू शकत नाही अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी यावर दिली आहे.
जालनातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला नसल्याचा माहिती अधिकारात समोर आलंय. त्यामुळे सरकार बनून सरकार इतकी शक्ती असणारा हा व्यक्ती कोण त्याचा शोध मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.