डोंबिवली ;- राज्य सरकारने मान्य केलेले मराठा आरक्षण लवकरात लवकर लागू करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांची तब्येत ढासळत आहे त्याच पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला सुनावलं आहे. फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेच्या तब्येतीची काळजी घ्यावी अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एका ट्विट द्वारे केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केले होते. त्यानंतर तर सरकारने कुणबी समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचे मान्य केले. मात्र या यासंदर्भात अद्यापही कुठलाही अध्यादेश काढण्यात आला नाही. त्यानंतर आता पुन्हा सरकारने अध्यादेश काढावा यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण केले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. यासंदर्भात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत मनोज जरांगे यांची तब्येत ढासळत चालली आहे अशावेळी सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. कोण चूक व कोण बरोबर हे येणारा काळ ठरवेल, परंतु सरकारने कोणाच्याही जीवाशी खेळू नये, असे भावनीक आवाहन त्यांनी केले आहे.