मंजुळा शेट्टये हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल : ६ तुरूंग कर्मचा-यांची नावे
मुंबई : भायखळा तुरूंगातील मंजुळा शेटये हिच्या हत्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात सहा अधिका-यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे असा आरोप आहे.
भायखळा जेलमधील मंजुळे शेट्ये २४ जून २०१७ रोजी मृत्यू झाला होता. अंडी आणि पावाच्या हिशेबावरुन तुरुंगातील ६ महिला अधिकाऱ्यांनी मंजुळाला अमानुष मारहाण केली होती. यात गंभीर जखमी झालेल्या मंजुळाचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, मात्र महिला कैद्यांनी याविरोधात आवाज उठवला आणि मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणाची दखल घ्यावी लागली होती. पोलिसांनी 182 साक्षीदारांचा जबाब घेतला असून यात तुरुंगातील 97 कैद्यांचा समावेश आहे. शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी तसेच भ्रष्टाचाराप्रकरणी तुरुंगात असलेल्या वैशाली मुदळेच्या जबाबाचाही आरोपपत्रात समावेश आहे.