अखेर पाच महिन्यानंतर माणिकलाल मैदान खुलं 

घाटकोपर :  जुलै महिन्यात दामोदर पार्क येथील चार मजली साईदर्शन इमारत कोसळल्यानंतर या इमारतीचा मातीचा ढीग महानगरपालिकेने माणिकलाल मैदानात टाकल्याने  मुलांना खेळण्यासाठी हे मेदान पुर्णतः बंद करण्यात आले होते . या संदर्भात स्थानिक युवकांनी पालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केला होता. स्थानिक नगरसेवक व बाजार उद्दान समितीचे सदस्य सूर्यकांत गवळी यांनी याची  तात्काळ दखल घेतली. या मैदानावरील मातीचा ढीग उचलण्याचे काम सुरु असून १०० ट्रक भरून नवीन लाल माती आणून हे मैदान पूर्ववत करण्यात येणार असल्याचं नगरसेवक  गवळी यांनी सांगितले . अखेर ५ महिन्यानंतर बंद असलेले मैदान मुलांनां खेळण्यासाठी सुरु झाल्याने मुलांच्या चेह-यावर आनंद पसरलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!