डोंबिवलीत एकाच दिवशी तीन मंदिरांवर पालिकेचा बुलडोझर
डोंबिवली : रस्त्यात अडथळा ठरलेल्या व अनधिकृत मंदिरांवर कारवाई करण्याचा सपाटा कल्याण डोंबिवली महापालिकेने लावला आहे. पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी डोंबिवलीत एकाच दिवशी तीन मंदिरावर बुलडोझर फिरवून जमिनदोस्त केले.
डोंबिवली पूर्वेतील आजदे गाव येथील ५० वर्षे जुने असलेले नेकनी देवी मंदिरावर पालिकेने कारवाई केली. तसेच कल्याण शीळ रस्त्यावरील दत्तमंदिर आणि काळूबाई मंदिर अशा एकूण तीन मंदिरे जेसीबीच्या साहययाने जमिनदोस्त केली. ही मंदिरे वाहतूकीस अडथळा ठरल्याने ती जमिनदोस्त करण्यात आलीय. महापालिकेचे ई प्रभाग कार्यालय आणि मानपाडा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही धडक कारवाई करण्यात आली. चार दिवसांपूर्वीच पालिकेने मुख्यालयाच्या आवारात अनेक वर्षापासून असलेल्या गोरखनाथ मंदिरावर कारवाई करून जेसीबीच्या साहययाने जमीनदोस्त केले होते. त्यामुळे मंदिरांवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले असल्याचे चित्र दिसून येतय.
हा पहा व्हिडीओ
फक्त मंदिरेच वाहतुकीला अडथळा ठरत आहेत का? पुतळे अडथळा ठरत आहेत, ते का काढत नाहीत?