विद्यार्थी व पालकांच्या न्याय हक्कासाठी मनसे आंदोलनात उतरेल
विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांचा इशारा
डोंबिवली : कल्याण डोंबिवली शिक्षण विभागाचा पून्हा एकदा सावळा गोंधळ चव्हाटयावर आलाय. राज्य सरकारचे आदेश असतानाही विद्याथ्यांच्या बँक खात्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे शासन अनुदानाचे पैसे जमा होऊ शकलेले नाही. शिक्षण विभाग व महापालिका प्रशासनाकडूनही टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना शासनाच्या अनुदानापासून वंचित राहावे लागल्यास त्यांच्याबाजूने मनसे आंदोलनात उतरेल असा इशारा केडीएमसीतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी दिलाय.
सरकारी शाळांमधून शिक्षण घेणा- या गोरगरीब विद्याथ्यांना शालेय साहित्य, वस्तू व गणवेश मिळताना विलंब होत असल्याने पालकांनीच हे साहित्य खरेदी करून त्यांचा खर्च शिक्षण विभागाने विद्याथ्याँच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. त्यासाठी विद्याथ्र्यांचे बँक खाते काढण्यास सांगितले होते. राज्य सरकाराच्या आदेशानुसार पालकांनीही स्वत:च्या पैशातून विद्याथ्र्यांना शालेय साहित्य व वस्तू खरेदी करून घेतल्या. महापालिका शाळेत गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थती नाजूक असतानाही पालकांनी उसनवारी घेऊन विद्याथ्यांना शालेय साहित्य खरेदी केली आहेत. त्यांचे देयके शिक्षकांकडे दिली असून शिक्षकांनी ते शिक्षण समितीकडे पाठवले आहेत. मात्र अजूनही विद्याथ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याने पालक मेटाकुटीला आले आहेत. केडीएमसीच्या शिक्षण विभागाकडून अजूनही विद्याथ्यांच्या बँक खात्याचा कोणताही निर्णय न घेतल्याने शासन अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत असे हळबे यांनी सांगितलं. या सगळया प्रकारामुळे पालकवर्ग त्रस्त झाला असून खर्च केलेली रकमा कधी जमा होणार अशी विचारणा शिक्षण विभागाकउे करीत आहे. शिक्षण समितीच्या बैठकांमध्येही हा विषय चर्चेला घेतला नाही. राज्य सरकारने परिपत्रक जारी करूनही त्याची अंमलबजावणी नक्की कोणी करावी असा प्रश्न शिक्षण विभागाचे उपायुक्त मुख्य लेखा अधिकारी प्रभारी महापालिका सचिव यांना पडला असल्याने त्यांच्याकडून टोलवाटोलवी सुरू असल्याचा आरोप हळबे यांनी केलाय.