शिवाजी पार्कात मंडप कोसळला ३ भीमसैनिक जखमी 

मुंबई : मुंबई महापालिकेने शिवाजी पार्कात उभारलेला मंडप कोसळून तीनजण जखमी झाले आहेत.  यमुनाबाई खंदारे ४० वर्षे . महादेव खंदारे ५५ वर्षे आणि  निलेश भंडारी २८ वर्षे अशी जखमी भीमसैनिकांची नावे आहेत. जखमींना सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून आणि परराज्यातूनही भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांना निवारा म्हणून महापालिकेने दादरमधील शिवाजी पार्कात  मंडप  उभारला होता मात्र  हा मंडपअचानक कोसळल्याची घटना घडली. ओखी चक्रीवादळामुळे मुंबईत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शिवाजी पार्कमध्ये चिखल झाला आहे. त्यामुळे देशभरातून आलेल्या भीमबांधवांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच  सकाळी बृहन्मुंबई महापालिकेतर्फे देण्यात आलेल्या सेवा-सुविधांबाबत जनसंपर्क विभागाने संकलित केलेल्या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते शिवाजी पार्क मैदानावरील महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील स्वागत कक्षात करण्यात आले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!