डोंबिवलीकरांना आता घरी मिळणार आरोग्य सेवा 

डोंबिवली :  वाढलेले आयुर्मान, दीर्घकालीन आजारांचे वाढलेले  प्रमाण, व्यस्त कामाचे वेळापत्रक आणि शस्त्रक्रिया पश्चात सेवेची वाढलेली मागणी यामुळे महानगरांमध्ये घरी आरोग्य सेवांचीमागणीही वाढत आहे. डोंबिवलीतील एसआरव्ही ममता हॉस्पिटलतर्फेनाइटिंगेल्स होम हेल्थकेअर सर्व्हिसेसच्यासहकार्याने एक्स्पर्ट होम हेल्थकेअर सर्व्हिसेस ही सेवा रुग्णांना उपलब्ध करून देण्यात  येणारआहे. या माध्यमातून रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा घरपोच मिळणारआहे. या सेवांमध्ये घरी देण्यात येणारी फिजिओथेरपी, अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी काळजीवाहक, कमी वेळेची  नर्सिंग सेवा, दीर्घ  वेळेची  नर्सिंग  सेवा  आणि  घरी  अतिदक्षता सेवा यांचा  समावेश आहे.  गंभीर  आजार  असलेले  रुग्ण  आणि  ज्यांना शस्त्रक्रिया पश्चात आरोग्य सेवेची  आणि  पुनर्वसन  सेवेची  गरज  आहे, अशा रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे. अनेक  अभ्यासांतीआढळून आले आहे की, घरच्या घरी वैद्यकीयउपचार दिल्यास त्यांचा परिणाम जलद होऊन प्रकृती सामान्य लवकरहोते. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे रुग्णाचे निरीक्षण करणे, इन्फ्युजन,शस्त्रक्रियेच्या जखमेला मलमपट्टी करणे, कॅथेटरायझेशन इत्यादीवैद्यकीय सेवा घरच्या घरी देणे शक्य झाले आहे. या वैद्यकीय सेवा पूर्वीकेवळ हॉस्पिटलमध्येच दिल्या जाऊ शकत होत्या”एखादा आजार पूर्ण बरा होण्यासाठी शस्त्रक्रिये पश्चात आरोग्य  सेवा अत्यंत  महत्त्वाची  असते,  अशी  एसआरव्ही  ममतामध्ये  आमची  धारणा आहे.  एक  टर्शरी  केअर  हॉस्पिटल  म्हणून  नाइटिंगेल्स होम  हेल्थ सर्व्हिसेसचे सहकार्य घेताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. अत्यंत तळमळीने आणि काळजीपूर्वक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हाआमच्यातील समान धागा आहे. त्यांच्यातर्फे आमच्या सर्व रुग्णांनालवकरात लवकर पूर्ण बरे होण्यासाठी घरच्या घरी वैद्यकीय सेवाउपलब्ध करून देण्यात येणार आहे. आमच्या वैद्यकीय तज्ज्ञांतर्फेउपलब्ध करून देण्यात येणाऱ्या घरी आरोग्य सेवा या आम्ही देत असलेल्या वैयक्तिक रुग्णसेवेचा विस्तारित भाग असेल.”, असे एसआरव्ही ममता हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. अभयविस्पुते  म्हणाले.  मुख्य  कार्यकारी  अधिकारी ललित  पै म्हणाले, “वाजवी  खर्चात मल्टि- स्पेशिअॅलिटी  वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या  एसआरव्ही  ममता  हॉस्पिटलसोबत काम  करण्यास नाइटिंगेल्स  उत्सुक आहे.  रुग्णांना  सहज उपलब्ध होईल  अशा  आणि सक्षम   वैद्यकीय  गृह वैद्यकीय  सेवा  उपलब्ध  करून देण्याचा  आम्ही  एकत्रित प्रयत्न करू असे पै यांनी सांगितलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *