महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर …

डोंबिवली ( शंकर जाधव ) ; भाजप नगरसेवक तथा डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महेश पाटील प्रतिष्ठान आणि वेलनेस फॉरेव्हर यांच्या संयुक्त विद्यामाने पूर्वकडील शिवप्रतिमा सभागृहात ज्येष्ठ नागरिक वाढदिवस सोहळा आणि मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. यावेळी उपस्थित नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांचे ज्येष्ठ नागरिकांनी आभार मानले.

यावेळी नगरसेविका डॉ.सुनिता पाटील, सायली विचारे,खुशबू चौधरी, नगरसेवक विनोद काळण,संदीप पुराणिक, राजन आभाळे, निलेश म्हात्रे, मनीषा राणे, रसिका पाटील, सुरेखा पांडे,राजश्री पाजंणकर, नंदू जोशी, शशिकांत कांबळे, संजय विचारे, हनुमान ठोंबरे, बबन पगारे,स्थानिक नगरसेविका पूजा म्हात्रे आदि उपस्थित होते. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी भाजप नगरसेवक महेश पाटील हे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करत असतात. महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने ६० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूची शास्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे. यावेळी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील म्हणाल्या, महेश पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजवर ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार केले जाते. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप,प्रभागात वृक्षारोपण केले. या आरोग्य शिबिरात ज्या ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदू अथवा काचबिंदू असेल त्यांचे प्रतिष्ठानच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. आरोग्य शिबिराचा ५०० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.यावेळी कॅप्टन विजयकुमार सच्चान यांच्या वडिलांचा सत्कार करण्यात आला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!