रिजन्सी ग्रुपचे सीएमडी महेश अग्रवाल उत्कृष्ट समाजसेवा पुरस्काराने राज्यपालांकडून सन्मानित 

कल्याण (प्रतिनिधी )  : रियल इस्टेट क्षेत्रात अग्रणी कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या रिजन्सी ग्रुपचे सीएमडी महेश अग्रवाल यांना  उत्कृष्ट समाजसेवा पुरस्काराने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. कल्याण जनता सहकारी बँकेच्यावतीने यंदाचा उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार अग्रवाल यांना जाहिर करण्यात आला आहे. राजभवनात पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी सीएमडी महेश अग्रवाल यांच्या पत्नी सुमन अग्रवाल, अनिल भठीजा आदी उपस्थित होते
रिजन्सी ग्रुपचे सीएमडी महेश अग्रवाल हे बांधकाम क्षेत्रातील यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात.  या क्षेत्राबरोबरच अनेक सामाजिक कार्यातही त्यांचा पुढाकार असतो. तसेच अनेक सामाजिक व सेवाभावी संस्थांनाही त्यांच्याकडून मदतीचा हातभार मिळत असतो. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अग्रवाल यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. कल्याण अग्रवाल समाज अध्यक्ष अनिलकुमार अग्रवाल, जितेंद्र गुप्ता, नितीन अग्रवाल, पीडी सराफ, प्रदीप रूंगडा, अंबरनाथचे उद्योगपती दिनेश नटवरलाल खेतान- अग्रवाल, संजय अग्रवाल, नवीन बंसल आदीनी महेश अग्रवाल यांना मिळालेल्या पुरस्काराने समाजाचा गौरव झाला आहे अशी भावना व्यक्त केली. या पुरस्काराने सीएमडी महेश अग्रवाल यांचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *