कल्याण : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांच्या मार्फत दि.१७ डिसेंबर २०२२ पंडित दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत गुणगोपाळ मंदिर मैदान, तिसगाव, चक्की नाका चौक, कल्याण पूर्व येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आयुक्तालय सचिव तथा आयुक्त डॉ. श्री. रामास्वामी एन. तसेच ठाणे जिल्हयातील लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये ठाणे येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच या मेळाव्यामध्ये उद्योजकता मार्गदर्शन आणि करियर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नोकरीच्या संधी :- या महारोजगार मेळाव्यामध्ये Quess Corp Ltd, ASCII Pvt.Ltd, Stealth Health Mngt, Reliable Labs Pvt Ltd, Gharda Chemicals, Hawkins Cookers Pvt.Ltd, PSN Supply Chain Soloution Pvt.Ltd, Aadish Consultancy, Indo Amines, Reliable HUB”s Engineering (India) Pvt Ltd, Pitambari Products Pvt Ltd, Bharat Gears, Suyash Global Pvt Ltd, Sands Senargy, Purohit Textile & Process, Promos Engg, Jade Rubber Product Pvt Ltd, Kalpavruksha, Connect well Industrys, BEW Engg,Markrich Apparel Pvt Ltd, Nexg Apparel LLP या विविध नामांकित कंपन्या मुलाखत घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

९ वी, १० वी, ग्रॅज्यूएट, पोस्ट ग्रॅज्यूएट, आयटीआय, इंजिरिअरिंग ई.शैक्षणिक पात्रता असणा-या उमेदवारांसाठी बँक ऑफीस जॉब, एचआर ॲडमिन, एज्युकेशन कौन्सेलर, हाऊसकेअर नर्स, आयटी जॉब्स्, बँक ऑफीसर, सेल्स ऑफीसर, सेल्स एक्झिक्यूटिव्ह, टेली कॉलर, स्टोअर इंचार्ज, कस्टमर सर्व्हिस, फोन बँकिंग, ब्रांच बँकिंग, फॅसिलिटी अटेंडंट हाउसकिंपिंग, वॉर्ड बॉय, पॅन्ट्री बॉय, डाटा सायंटिस्ट, सॉफटवेअर डेव्हलपर, कारपेंटर, वेल्डर, सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर, प्लंबर अशा विविध प्रकारची एकूण १३१०९ रिक्तपदे उपलब्ध आहेत.

स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय करणारे महामंडळाचा सहभाग:-

या मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगासाठी आर्थिक सहाय उपलब्ध करुन देणारे विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागसवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इ.ची माहिती पुरवणारी स्टॉल लावण्यात येणार असून याव्दारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश असणार आहे.

राज्य शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून त्यांच्यामार्फत राबविण्यात येणा-या विविध प्रशिक्षण योजनांची माहिती देण्यासाठी सहभागी होणार आहे. या महारोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवून रोजगाराची संधी प्राप्त करावी असे आवाहन जिल्हा कौशल्य कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,ठाणे सहायक आयुक्त संध्या साळुंखे यांनी केले आहे.
़़़़़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!