44 हजार ईव्हीएम आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र,
मतदान प्रक्रियेसाठी 73 हजार 837कर्मचारी कार्यरत
मुंबई, दि. 5 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघांमध्ये दि.11 एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण 116उमेदवार आहेत. सात मतदारसंघात14 हजार 919 मतदान केंद्र आहेत तर1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार आहेत. त्यामध्ये 66 लाख 71 हजार पुरुष तर 63 लाख 64 हजार महिला आणि 181 तृतीयपंथी मतदार आहेत. सुमारे 44 हजार ईव्हीएम यंत्र आणि20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. सुमारे 73 हजार 837कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
राज्यात एकूण 4 टप्प्यात मतदान होणार असून वर्धा, रामटेक, नागपूर,भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर,चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांमध्ये 11 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. वाढते तापमान लक्षात घेता या मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी तसेच सावलीची व्यवस्था करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
मतदानासाठी लागणारे साहित्य जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गडचिरोली- चिमूर या नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 अशी करण्यात आली आहे.
वर्धा मतदारसंघात सुमारे 2 हजार 26एवढे मतदान केंद्र असून 8 लाख 93 हजार पुरुष तर 8 लाख 48 हजार महिला मतदार आहेत. या मतदार संघात 17 लाख 41 हजार एकूण मतदार आहेत. रामटेक मतदार संघात2 हजार 364 मतदान केंद्र असून 9 लाख 96 हजार पुरुष तर 9 लाख 24हजार महिला असे एकूण 19 लाख21 हजार मतदार आहेत. नागपूर मतदारसंघात 2 हजार 65 मतदान केंद्र आहेत. 10 लाख 96 हजार पुरुष तर 10 लाख 63 हजार महिला असे एकूण 21 लाख 60 हजार एकूण मतदार आहेत. भंडार-गोंदिया मतदारसंघात 2 हजार 184 मतदान केंद्र आहेत. 9 लाख 5 हजार पुरुष तर9 लाख 3 हजार महिला असे एकूण18 लाख 8 हजार मतदार आहेत.
गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी 1हजार 881 मतदान केंद्र असून 7लाख 99 हजार पुरुष आणि 7 लाख80 हजार महिला असे एकूण 15 लाख 80 हजार मतदार आहेत. चंद्रपूर मतदार संघामध्ये 2 हजार 193मतदान केंद्र असून 9 लाख 86 हजार पुरुष आणि 9 लाख 22 हजार महिला असे एकूण 19 लाख 8 हजार मतदार आहेत. यवतमाळ-वाशिम मतदार संघामध्ये 2 हजार 206 मतदान केंद्र आहेत. 9 लाख 93 हजार पुरुष मतदार तर 9 लाख 21 हजार महिला असे एकूण 19 लाख 14 हजार मतदार आहेत.
ज्या मतदारसंघात 15 पेक्षा जास्त उमेदवार आहेत, अशा मतदान केंद्रांवर2 बॅलेट युनिट बसविण्यात येतात. त्यासोबत 1 कंट्रोल युनिट असते. पहिल्या टप्प्याकरिता 26 हजार बॅलेट युनिट आणि 18 हजार कंट्रोल युनिट देण्यात आले असून 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. बहुतांश सर्वच मतदान केंद्रांवर राखीव यंत्र देण्यात आली आहेत.
00000