काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या
मुंबई: काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांनी शनिवारी मुलूंड येथील राहत्या घरी नॉयलॉन दोरीने सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली, त्यांना उपचारासाठी फोर्टिज हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले शेलार हे मुलुंड पश्चिमेतील बिलवा कुज सोसायटीत राहत होते त्यांच्या आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झाले नसले तरी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे,

संवेदनशील नेतृत्व हरपले : विखे पाटील
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. महादेवराव शेलार यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक असून, त्यांच्या रुपात विचारधारेशी बांधिलकी असलेले एक संवेदनशील नेतृत्व हरपल्याची प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. ते कायम हसतमुख,मनमिळावू आणि सहकार्यासाठी तत्पर असायचे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस असताना जनता दरबारच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षातील मंत्री व नागरिकांमधील एक दुवा म्हणून त्यांनी उत्तम काम केले. सतत कार्यमग्न राहणाऱ्या अॅड. महादेवराव शेलार यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले असून, मी एक व्यक्तिगत मित्र गमावला आहे, या शब्दात विरोधी पक्षनेत्यांनी दुःख व्यक्त केलय,

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!