विकास निधी खर्च करण्यात महादेव जानकरांची आघाडी
सातारा : “सातारा जिल्ह्यातील विधानपरिषदेच्या चार आमदारांचा आठ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच मागील वर्षीचा दोन कोटी 60 हजार निधी यावर्षी खर्च करण्यास उपलब्ध झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत पाच कोटी 72 लाख 28 हजार रूपये इतका निधी खर्च झाला आहे. विधान परिषदेच्या आमदारांची निधी खर्चाची टक्केवारी 60 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे. महादेव जानकर यांची निधी खर्चात आघाडी घेतली आहे.”
आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून 2017-18 मध्ये ऑक्टोंबरअखेर सात कोटी आठ लाख 29 हजार रूपये खर्च झाले आहेत. एकुण उपलब्ध निधीच्या 50 टक्केही निधी खर्च झालेला नाही. विधानसभेच्या आमदारांत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तर विधान परिषद आमदारांत पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी सर्वाधिक निधी खर्च करुन आघाडी घेतल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात विधानसभेचे आठ तर विधानपरिषदेचे चार आमदार आहेत. प्रत्येक आमदारांना वर्षाला स्थानिक विकास कार्यक्रमातंर्गत दोन कोटींचा निधी मिळतो. यानुसार विधानसभेच्या आठ आमदारांचा वर्षाकाठी 16 कोटींचा निधी जिल्ह्याला उपलब्ध होतो. विधानपरिषदेच्या चार आमदारांचा आठ कोटी असा एकुण 24 कोटी रूपये उपलब्ध होतात. त्यापैकी यावर्षी ऑक्टोंबरअखेर 12. 80 कोटी रूपचांचा निधी खर्च झाला आहे. हा खर्च उपलब्ध निधीच्या 50 टक्के आहे. परंतु, विधानसभेच्या आमदारांची खर्चाची टक्केवारी 50 टक्केपेक्षा कमी आहे. गेल्या वर्षीचा तीन कोटी 22 लाख 41 हजार रूपयांचा अखर्चित निधी यावर्षी खर्चासाठी उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षीचा अखर्चित निधी आणि यावर्षीचा निधी असा एकुण 19 कोटी, 22 लाख 41 हजार रूपये उपलब्ध झाले आहेत. त्यातून तीन कोटी 85 लाख 88 हजार रूपयांच्या कामांना प्रशासकिय मान्यता दिलेली आहे.
एकुण उपलब्ध निधीच्या सात कोटी रूपयेच खर्च झाले आहेत. या निधी खर्चात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या फंडातून एक कोटी 85 लाख, मकरंद पाटील यांच्या फंडातून एक कोटी 37 लाख तर बाळासाहेब पाटील यांच्या फंडातून एक कोटी 13 लाख रूपये खर्च झाले आहेत. उर्वरित आमदारांचा निधी खर्चाचे आकडेवारी अशी : शशिकांत शिंदे 24.32 लाख, दीपक चव्हाण 33. 49 लाख, जयकुमार गोरे 57.17 लाख, पृथ्वीराज चव्हाण 90.87 लाख, शंभूराज देसाई यांच्या फंडातून 65.24 लाख रूपयांचा निधी खर्च झाला आहे.
विधान परिषदेचे आमदार सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा दोन कोटी 59 लाख 64 हजार, आनंदराव पाटील यांचा दोन कोटी 57 लाख, महादेव जानकर यांचा दोन कोटी 20 लाख, नरेंद्र पाटील यांच्या फंडातून दोन कोटी 63 लाख रूपये उपलब्ध झाले आहेत. खर्च झालेल्या निधीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फंडातून एक कोटी 18 लाख, आनंदराव पाटील यांच्या फंडातून एक कोटी 32 लाख , महादेव जानकर यांच्या फंडातून एक कोटी 85 लाख रूपये तर नरेंद्र पाटील यांच्या फंडातून एक कोटी 35 लाख रूपये खर्च झाले आहेत. दोन्हीकडील आमदारांचा निधी हा रस्ते, पाणी व मुलभूत सुविधांसह सांस्कृतिक भवने यावर खर्च करण्यात आला आहे.
परसातील कुक्कुटपालनास चालना देण्यासाठी राज्यातील ३०२ तालुक्यांत सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना.
यावर मंत्री महादेव जानकर यांची प्रतिक्रिया