पालकांनी मुलांचे मित्र होण्याची गरज  – डॉ. चंद्रशेखर दाभाडकर

महाड :– आजच्या स्पर्धेच्या आणि इंटरनेटच्या युगात मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी पालकांनी मुलांचे मित्र होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा बालरोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांनी महाड येथील दिशा प्रतिष्ठान आयोजीत किशोरवयीन मुलांचे आणि पालकांचे समुपदेशन कार्यक्रम प्रसंगी केले. महाडच्या भारती वडाळकर यांच्या दिशा प्रतिष्ठान संचलीत दिशा अॅबॅकस व वैदिक मॅथस् या गणित प्रिशिक्षण वर्गाच्या वतिने या समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाड येथे दिशा प्रतिष्ठानच्या वतीने मुलांचे आणि पालकांचे समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमासाठी पालकांना समुपदेश करण्यासाठी प्रसिद्ध बालरोग तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांच्यासह रंगसुगंधचे सुधीर शेठ, को.म.सा.पा.चे अ.वि.जंगम, रश्मी जंगम मॅडम, दिशा अॅबॅकसच्या संचालीका भारती वडाळकर व मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थितीत होते. दरम्यान या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. दाभाडकर यांनी अॅबॅकसचे यशस्वी प्रशिक्षण देऊन मुलांमधील गणिताची भिती घालवुन त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण केल्या बद्दल भारती वडाळकर यांना धन्यवाद दिले. या प्रसंगी पुढे बोलताना डॉ. दाभाडकर म्हणाले की, आजच्या टी.व्ही आणि इंटरनेटच्या युगात पालक आणि मुलांनसाठी वाचन महत्वाचे आहे. पालक जसे वागतात, राहतात त्याचे अणुकरण मुले करत असतात. त्यामुळे माझी हीच चळवळ आहे कि जास्तीत जास्त पालकांपर्यत पोहचायच. आज मुलांमध्ये आत्महत्या, गुन्हेगारी, मुलिंवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. मुलांच्या 20 वर्षा पर्यंतच्या किशोर आणि पौंडावस्थेत काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांच्या उज्वल भविष्यासाठी प्रत्येक पालकांन साठी समुपदेशन करण्यासाठी रायगड जिल्हा मिशन अंतर्गत प्रत्येक शाळेतु पालकापंर्यत पोहचण्याचा प्रयत्न असल्याचे डाॅ.दाभाडकर या वेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!