नवीन दुचाकी त्याच्या जीवावर बेतली
महाड (निलेश पवार) : नवीन दुचाकी घेण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले, त्या दुचाकीवरून मित्राला घेऊन तो स्वैर करण्यासाठी निघाला. पण ती दुचाकीच त्याचा जीवावर बेतली.. मुंबई गोवा महामार्गावर केंबुर्ली गावानजीक दुचाकी आणि शाळेच्या मिनी बसची समोरासमोर ठोकर होऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालक मंगेश सेनापती बोराडे रा. तळोशी फाटा आणि त्याचा मित्र विशाल वसंत शिंदे रा. वावे धारवली, हे दोघेही जागीच ठार झाले.
महाड जवळ कंेबुर्ली गावाजवळ असलेल्या महामार्गावरील वळणावर हा अपघात झाला. मंगेश बोराडे याने पंधरा दिवसापूर्वीच सुझूकी कंपनीची केटीएम स्पोर्ट बाईक घेतली होती. मंगेश एका हाॅटेल मध्ये कामाला होता. दुचाकीला अद्याप नंबर देखील मिळाला नाही. मंगेश हा मित्र विशाल याला घेऊन दुचाकीवरून फेरफटका मारण्यासाठी गेला होता. याचवेळी शाळेच्या बसला दुचाकीची ठोकर बसल्याने अपघात घडला. या अपघातात बस चालक इंद्रजीत मच्छींद्र ठोंबरे रा.काकरतळे महाड ह हा गंभीर जखमी झाला आहे अपघातात या दोन्ही तरूणांचे मृतदेह महामार्गावर पडले. दोघेही स्कुल व्हॅनवर आपटल्याने डोेक्याचा भाग फुटून रस्त्यावर पडला होता. यामुळे कांही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग पोलीस पथकाने वाहतुक कोंडी दुर करण्यास मदत झाली.