मुंबई/ प्रतिनिधी : चेंबूरमधील एच. पी. गॅस सिलिंडरचे अधिकृत वितरक मेसर्स पी. ए. झवेरी गॅस एजन्सीतर्फे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या अंतर्गत एच. पी.गॅस बुक करणे आणि त्याचे पेमेंट अदा करणे ग्राहकांना सहज आणि सोपे जाणार आहे.
गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ ग्राहकांच्या सेवेत असलेल्या एच. पी. गॅस सिलिंडरचे अधिकृत वितरक मेसर्स पी. ए. झवेरी गॅस एजन्सीने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ‘करो डिजिटल, रहो बेफिकर’! चा नारा दिला आहेच. त्याअंतर्गत easy to book safe to pay हा सुरक्षा मंत्र आता ग्राहकांच्या पसंतीस उतरतो आहे. असंख्य ग्राहकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वितरक मेसर्स पी. ए. झवेरी गॅस एजन्सीच्या कॅशलेस मोहिमेला जोरदार प्रतिसाद दिला आहे. या मोहिमे अंतर्गत व्हाट्सऍप बुक टू ‘९२२२२ ०११२’ या क्रमांकावर घरपोच एच. पी. गॅस सिलिंडरची नोंदणी आणि पैसे अदा करता येणार आहेत. आमच्या चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, ट्रॉम्बे येथील ग्राहकांनी या मोहिमेचा अधिका अधिक लाभ घ्यावा, असे आवाहन वितरक M/S P. A. Zaveri GAS Agency चेंबूर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
*****