मुंबई : एसटी कर्मचा-यांचे गेल्या १३ दिवसांपासून संप सुरू आहे या ऐन दिवाळीत सुरू असलेल्या संपामुळे एसटीचे तब्बल ६५ ते ७० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे संपामुळे प्रवासी संख्या घटलीच मात्र कोटयावधी रूपयाच्या महसूलावर पाणी फेरले आहे.
मात्र एकिकडे संपामुळे सगळेच त्रस्त असतानाच दुसरीकडे  सत्ताधारी आणि विरोधक बॉम्ब फोडण्यात मशगुल झाले आहेत. त्यामुळे कर्मचा-यांचे हाल आणि प्रवासी बेहाल असेच चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे. 

एसटी कामगारांनी २९ ऑक्टोबरपासून संपाची हाक दिली आहे राज्य शासनपात विलीनीकरण करावे आणि शासकीय कर्मचा-यांप्रमाणे वेतन द्यावे या मागण्यांसाइी संप सुरू आहे आतापर्यंत संपावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही ऐन दिवाळी सुरू असलेल्या संपामुळे न्यायालयाने कर्मचारी संघटनांना फटकारले होते. मात्र तरीही कर्मचारी संघटनांनी संप सुरूच ठेवला आहे.

राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. प्रवाशांना वेठीस धरू नये असेही त्यांनी म्हटले होते. संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. अखेर आज मंगळवारी एसटी महामंडळ प्रशासनाने राज्यातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. राज्यातील 16 विभागातील 45 आगरांमधील 376 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.

 कल्याण एसटी आगारात सुद्धा एसटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केल आहे.त्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल होत आहे. कल्याण एस डेपोतून 650 फेऱ्या रद्द असल्याने दिवसाला १० लाखाचा फटका एस टी महामंडळाला बसत आहे.. नवी मुंबई ,पनवेल ,भिवंडी यांच्या प्रवाशांच्या सेवेसाठी एन एम टी व केडीएमटी ने  जादा बसेस सोडल्या आहेत ठाण्यातही प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करवा लागत आहे त्यामुळे अधिकचे पैसे मोजावे लागत आहे त्यामुळे प्रवाशांची फरफट सुरूच आहे.

आज मंत्रालयावर मोर्चा

आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मंत्रालयावर एसटी कामगारांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!