मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठींबा देण्यासाठी नागपूरच्या रामटेक येथून निघालेली यात्रा एक हजार किमी अंतर कापून आज मातोश्रीवर पोहचली. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी कार्यकत्यांना संबोधित केले.
कुणीतरी एवढे किलोमीटर पायपीट करून येणं हे आताच्या काळात अवघड नाही अशक्य आहे पण तुम्हाला असं वाटलं की मातोश्रीवर यावं आणि येऊन माझ्यासोबत उभं राहावं हा मी प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मानतो काही काळासाळी धनुष्यबाण त्यांनी चोरला असला तरी प्रभू राम माझ्यासोबत आहेत असं वक्तव्य शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलय
नागपूरच्या कार्यत्यांना संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, तुम्ही माझं जे कौतूक केलतं लोकशाही वाचवणं वगैरे ते माझं एकटयाचं काम नाही, किंवा माझया एकटयासाठी नाही ते पुढच्या सगळया पिढयांसाठी आहे.
ज्याप्रमाणे रामसेतू बांधताना वानसेना तर होतीच. पण खारसुध्दा होती जर त्यावेळी खारीने तिचा वाटा उचलला तर आपण सगळी जितीजागती माणसं एकत्र आलो तर लंकादहन नाही का करू शकत ? पूर्वी अशी आख्यायिका होती की दगडावर श्रीरामांचं नाव लिहून पाण्यात टाकला की तो तरंगायचा, आजच्या राजकारणात तसं झालं आहे. प्रभू रामाचं नाव घेऊन दगड तरंगताहेत, पण त्या दगडावर पाय ठेवून लंकेत जाण्यासाठी ते दगड तरंगले होते. आता दगडच तरंगतात आणि दगडच राज्य करतात, मग ख-या रामभक्तांनी करायचं काय ? ते रामभक्तांच काम मला तुमच्याकडून अपेक्षित आहे असे ठाकरे म्हणाले.
युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे निहाल पांडे यांच्या नेतृत्वात ही महाभारत यात्रा काढण्यात आली. नागपूरच्या रामटेक येथून २१ मार्च रोजी ही यात्रा सुरू झाली. युवा परिवर्तन सामाजिक संघटनेचे शंभरहून अधिक तरूण एक हजार किलोमीटरचा प्रवास करत ३० मार्चला रामनवमीच्या दिवशी मातोश्रीवर पोहचली.
आधी तरूणांनी शिवाजी पार्कात जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर मातोश्रीवर पोहोचले. उद्धव ठाकरे यांनी या तरुणांची भेट घेऊन त्यांचे म्हणणं ऐकून घेत त्यांना मार्गदर्शनही केलं. यावेळी या तरुणांनी जोरजोरात घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी माजी मंत्री सुभाष देसाई आणि संजय राऊत उपस्थित होते. यावेळी निहाल यांनी सांगितले की, ईडी, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात असून, त्याचा निषेध करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे.
हुकूमशाहीविरोधात ही यात्रा काढण्यात आली. शिवसेना फुटली असली तरी सर्वसामान्य माणूस हा उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे, असा दावा निहाल यांनी केला.