मुंबई  – महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म अडीच हजार वर्षांपूर्वी भारतातच झाला.आज नेपाळ मध्ये असणारे लुम्बिनी अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात होते.जन्म लुम्बिनी मध्ये;ज्ञानप्राप्ती बुद्धगयेत आणि महापरिनिर्वाण कुशीनगर मध्ये झाले असल्याने भगवान बुद्ध भारताचेच आहेत.मानवतेच्या कल्याणचा आदर्श बौद्ध धम्म जगाला देणारे भगवान बुद्ध केवळ नेपाळलाच नव्हे तर साऱ्या जगाला बुद्ध हवे आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

नुकतेच नेपाळने भगवान बुद्ध नेपाळचे असल्याचा दावा केला होता. यावर उत्तर देताना  रामदास आठवले यांनी भगवान बुद्ध यांचा जन्म लुम्बिनी ( नेपाळ)मध्ये झाला हे सत्य असले तरी भगवान बुद्ध हे भारताचे आणि संपूर्ण  विश्वाचे असल्याचे आठवले यांनी म्हंटले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी नुकतेच एका कार्यक्रमात भारताचे सर्वात महान महापुरुष कोण या प्रश्नावर उत्तर देताना भगवान बुद्ध भारताचे सर्वात महान महापुरुष असल्याचे  विधान केले होते. त्यावर नेपाळ सरकारने भगवान बुद्ध भारताचे नसून नेपाळ चे असल्याचा दावा केला होता.

नेपाळ च्या लुम्बिनी मध्ये भगवान बुद्धांचा जन्म झाला असला तरी अडीच हजार वर्षापूर्वी लुम्बिनी भारताचाच भाग होता. तसेच भगवान बुद्धांचे संपूर्ण जीवन कार्य ज्ञानप्राप्ती आणि महापरीनिर्वाण भारतातच झाल्याने भगवान बुद्ध हे भारताचेच असल्याचा दावा  आठवले यांनी केला. भारतात बुद्ध गया येथे ज्ञानप्राप्ती नंतर भगवान बुद्ध हे सम्यकसंबुद्ध झाले. बुद्ध झाले. त्यामुळे  भगवान बुद्ध हे भारताचे असून बुद्ध केवळ नेपाळ नाही तर  संपूर्ण विश्वाला बद्ध हवा आहे असे रामदास आठवले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!