मुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील चौथ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार असल्याने या मतदार संघातील प्रचार तोफा शनिवारी थंडावल्या​. पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा व कोकणातील काही मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी​, अमित शहा, शरद पवार​, उध्दव ठाकरे​, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे​, उपमुख्यमंत्री देवेंद्र फ​डणवीस​, अजित पवार  यांनी प्रचार सभा घेतल्या​. नंदूरबारमध्ये भाजपच्या विद्यमान खासदार डॉ हीना गावित यांच्या विरोधात काँग्रेसचे गोवाल पाडवी​, ​ संभाजीनगरमध्ये महायुतीचे संदीपान भुमरे महाविकास आधाडीचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील​ रिंगणात आहेत.​ अहमदनगरमधील भाजपचे खासदार डॉ सुजय विखे आणि राष्ट्रवादी शरद पवार ग​टाचे  निलेश लंके यांच्या लढत आहे​.​ जळगाव​मध्ये  भाजपच्या स्मिता वा​घ आणि शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात​ सामना रंगणार आहेत तर रावेर येथे भाजपच्या रक्षा खडसे​, रा​ष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे​ श्रीराम पाटील यांच्या लढत होणार आहे​. शिर्डीत शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे​, शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वा​घचौरे​, वंचितचे उत्कर्षा रूपवते यांच्यात तिरंगी लढत होणार आहे

पुणे जिल्हयातील मावळ येथे शिंदे सेनेचे श्रीरंग बारणे ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील यांच्या लढत आहे पुणे लोकसीाा मतदार संघात भाजपचे मुरलीधर मोहोळ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर वंचितचे वसंत मोरे यांच्या तिरंगी लढत होणार अह शिरूर मध्ये अजि तपवार गटज्ञचे शिवाजी आढळराव पाटील आणि शरद पवार गटाचे डॉ अमोल कोल्हे यांच्या सामना हो​णार आहे. ​

​  या ११ मतदारसंघात मतदार 

नंदुरबार​, जळगाव​, रावेर​, जालना​, छत्रपती संभाजीनगर​, मावळ​, पुणे​, शिरूर​, नगर​, शिर्डी​, बीड या ११ मतदारसंघाचा समावेश आहे​.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!