कल्याण/ प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील लॉकडाऊन संदर्भातील नवीन नियमावली रविवारी महापालिका प्रशासनोन जारी केली. महापालिका परिसरातील हॉटस्पॉट क्षेत्रात ३१ जूलैपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. केडीएमसी क्षेत्रात तब्बल ४८ ठिकाणे ही कोरोना हॉटस्पॉट असून या ठिकाणी सकाळी ७ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. उर्वरित ठिकाणी नियम आणि अटींसह दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
महापालिका क्षेत्रात २ जूलै ते १२ जूलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता त्यानंतर पून्हा सात दिवस वाढ करून १९ जूलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. १९ जूलैची मुदत आज संपणार असल्याने पालिकेने ही नवीन नियमावली जारी केली आहे. दरम्यान केडीएमसी क्षेत्रात कोरोनाचे एकूण ४८ हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले असून याठिकाणी ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
हॉटस्पॉट क्षेत्र वगळता संपूर्ण शहरात राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेनअंतर्गत सुरू राहिल. तर मॉल्स, मार्केट आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स बंद राहणार आहेत. सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठ आणि दुकाने पी1- पी2 नूसार चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे.