मोदींनी पाठवले आभाराचे पत्र
बेंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यावेळी बेंगळुरू येथील दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या बालकाने थेट पंतप्रधानांन सांत्वनपर पत्र पाठवले. त्याच्या या पत्राला पंतप्रधानांकडून उत्तर आले असून त्यात मोदींनी आभार व्यक्त केले आहे. भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी ही दोन्ही पत्रे ट्विट केली आहेत.
बेंगळुरू येथील आरूष श्रीवस्ता या दुसऱ्या इयत्तेतील बालकाने पंतप्रधानांना पाठवलेल्या सांत्वन पत्रात म्हंटले आहे की, “प्रिय पंतप्रधान नमस्कार, तुमच्या आईचे निधन झाल्याची बातमी टीव्हीवर पाहून मला दु:ख झाले. तुमच्या आई हिराबेन ज्यांचे वय 100 वर्षे होते त्यांचे आज निधन झाले.प्रिय पंतप्रधान कृपया माझी श्रद्धांजली स्विकार करा.त्यांच्या मृतआत्म्यास शांती मिळावी अशी प्रार्थना मी करतो. ओम शांती.” असे बालकाने आपल्या पत्रात नमूद केले आहे.
आरुषच्या सांत्वन पत्राला पंतप्रधानांनी उत्तर दिले असून त्यात पंतप्रधान म्हणाले की, आरूष श्रीवस्ता तू माझ्या आईसाठी दिलेली श्रद्धांजली मी स्विकार करतो. आईचे निधन हा कधीही न भरून येणारे नुकसान आहे, हे दु:ख शब्दांच्या पलिकडचे आहे. तू याबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली याबाबत मी तुझे आभार मानतो. अशा गोष्टीच मला दु:ख सहन करण्याची शक्ती आणि धैर्य देतात. असे पंतप्रधानांनी पत्रात म्हटले आहे.
भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी ही दोन्ही पत्रे ट्विटरवर शेअर केली आहे आहेत. आपल्या संदेशात खुशबू म्हणाल्या की, “हीच खऱ्या राज्यकर्त्याची गुणवत्ता आहे ! माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या शोक पत्राला प्रतिसाद दिला. हा जीवन बदलणारा प्रतिसाद असून, तरुणाच्या आयुष्याला योग्य दिशा देतील. असे खुशबू सुंदर यांनी आपल्या ट्विटर संदेशात नमूद केलेय.