सहा तासाच्या थरारानंतर बिबटया जेरबंद : मुलूंडकरांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
मुंबई : मुलुंड पूर्वेकडील नानीपाडा भागात आज सकाळी बिबट्या आढळून आल्याने खळबळ उडालीय. आतापर्यत बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी झालेत. जखमींना वीर सावरकर रुग्णालय आणि सायन रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. वन अधिकाऱ्यांनी या बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध केलं आणि त्याला पिंजऱ्यात डांबलं. तब्बल सहा तास हा थरार सुरू होता. अखेर बिबट्याला ताब्यात घेतल्याने मुलूंडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशेजारी असलेल्या मुलुंड, ठाणे परिसरात बिबट्या घुसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास नानी पाडा परिसरात बिबट्या शिरला. एका इमारतीच्या बेसमेंट शेजारी असलेल्या टाकीजवळ हा बिबट्या लपून बसला होता. बिबटयाने केलेल्या हल्ल्यात सहा जणांना जखमी केल्याने मुलूंडवासिय बिबटयाच्या दहशतीखाली सापडले होते. खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. वन अधिकाऱ्यांनी या बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध केलं आणि त्याला पिंजऱ्यात डांबलं. तब्बल सहा तास हा थरार सुरू होता.
सोमय्यांची सेल्फी कितपत योग्य
किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर चक्क जखमींबरोबर सेल्फी काढलेत. लोक जखमी असताना अशा वेळी खासदारांनी सेल्फी काढणे कितपत योग्य आहे. इतकी साधी गोष्ट खासदाराला कळत नाही का, हा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जातोय.
जखमींची नावे –
बालाजी कामटे (४०), कृष्ण पिल्ले (४०), सविता कूटे (३०) गणेश पुजारी (४५) अन्य दोन जणांचा समावेश आहे.