इगतपुरी, ३१ डिसेंबर – लोकसभा निवडणुकीत भाजपने सोलापूरसह शिर्डी व विदर्भातील दोन जागा रिपाइंला दिल्या तर नक्कीच निवडून आणू तसेच मित्र पक्षालाही बळकट करू. दोन जागा निवडून आल्या तर आम्हाला अधिकृत चिन्ह मिळेल. आपापसात जागावाटप करत असताना आरपीआयला विसरू नका, गावागावांत आमची मते आहेत. दहा जागा विधानसभेला मिळाव्या याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मी भेटणार आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी इगतपुरी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
आठवले यांचा नाशिक जिल्ह्याचा शासकीय दौरा असल्याने त्यांचे इगतपुरी येथे रिपाइंसह मित्र पक्षांच्या वतीने स्वागत करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत भाजपने सोलापूरसह शिर्डी व विदर्भातील दोन जागा रिपाइंला दिल्या तर नक्कीच निवडून आणू तसेच मित्र पक्षालाही बळकट करू. दोन जागा निवडून आल्या तर आम्हाला अधिकृत चिन्ह मिळेल. आपापसात जागावाटप करत असताना आरपीआयला विसरू नका, गावागावांत आमची मते आहेत. दहा जागा विधानसभेला मिळाव्या याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मी भेटणार आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी इगतपुरी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. आठवले यांचा नाशिक जिल्ह्याचा शासकीय दौरा असल्याने त्यांचे इगतपुरी येथे रिपाइंसह मित्र पक्षांच्या वतीने स्वागत करण्यात आले.