मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक ते संभाजीनगर सारख्या ग्रामीण भागात कायदा व सुव्यस्था ढासळली आहे. मुंबई ठाण्यात दिवसा डान्सबार सुरू असून अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगाराला सरकारकडून संरक्षण दिल जात आहे, असा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेप्रश्नी हे सरकार अपयशी ठरल्याची टीका केली.

शेतकऱ्यांचे व आरोग्याचे प्रश्न सोडवण्यास, कायदा व सुव्यवस्था राखण्यास हे सरकार अपयशी ठरल असल्याची टीका दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केली. सरकार आश्वासन देत, मोठंमोठया घोषणा करत मात्र पुढे चालत नाही, अशी परिस्थिती सरकारची आहे. परिवहन, आरोग्य, पर्यावरण, कायदा व सुव्यवस्था प्रश्न जसेच्या तसे आहे. गतिमान शासन आहे मात्र जनतेचे प्रश्न सोडवण्यास गती कुठे दिसत नाही असा टोला दानवे यांनी सरकारला लगावला.

सत्ताधाऱ्यांच्या चुकांवर बोट ठेवण हे विरोधी पक्षाचे काम असताना सरकार या विषयावर पाहिजे तितके गंभीर नाही, सरकार जाणीवपूर्वक विरोधकांनी दाखवलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करतय, असा आरोप दानवे यांनी केला.

ढिसाळ आरोग्यव्यवस्था

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात वेळेवर रुग्णवाहिका व उपचार न मिळाल्यामुळे ६ जणांना नाहक जीव गमवावा लागला.

राज्यात क्षयरोगाचे प्रमाण वाढलं असताना सरकार त्याकडे कमालीचे दुर्लक्ष करत आहे.
पुण्यात किडनी रॅकेटचे प्रकार समोर आले आहेत. ग्रामीण भागात महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने रिक्षात प्रसूती झाली. या सर्व घटना म्हणजे आरोग्य विभागावार सरकारच यंत्रणेच कोणतंही धाक राहील नाही. एकप्रकारे आरोग्यव्यवस्था ही ढिसाळ झाल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली. राजस्थानच्या धर्तीवर आरोग्य अधिकार कायदा राज्यात लागू केला पाहिजे, अशी सूचना दानवे यांनी सरकारला केली.

पुणे विभागात २९ तर संभाजीनगरमध्ये ५१ बारावीचे पेपर फुटीचे प्रकरणे समोर आली. यात मुख्य आरोपीला पकडण्याऐवजी चोर सोडून संन्यासाला पकडण्यात आले.
१० हजार रुपयांत बारावीची प्रश्नपत्रिका विकली गेली.

काही लोकांच्या कृत्यामुळे बारावीचा पेपर फुटला गेला. हा सरकारच्या नाकार्तेपणामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असल्याचे दानवे म्हणाले.

लोकशाहीत राहुल गांधींना न्याय मिळेल

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निलंबित केलं मात्र लोकशाहीत त्यांना न्याय मिळेल असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

अदानीसाठी बेकायदेशीररित्या जमिनीचे व्यवहार

कोकणात अदानीला कंपनीला जमीन देण्यासाठी बेकायदेशीर रित्या जमिनीची खरेदी विक्री सुरू आहे. संगमनेर येथे बोगस व्यवहार सुरू असून मूळ मालकाची परवानगी न घेता हे व्यवहार केले जातात. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. विरोधकांवर ईडी सीबीआयची चौकशी लागते, याप्रकरणीही तपास करण्याची मागणी दानवे यांनी गेली.

हे सरकार अदानीसाठी काम करत का की सर्वसामान्य माणसासाठी काम करत असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

संभाजीनगर मधील पंतप्रधान आवास योजना घोटाळ्यात ईडीची चौकशी लागते मात्र राज्य सरकार याप्रकरणी गप्प का असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला.

ठाणे महानगरपालिकेत काय चालत याच पत्र भाजपच्या आमदार यांनी दिले.
भूसंपादन करताना ज्याला घर दिले पाहिजे त्याला न देता नवीन लोकांना घर दिल गेलं. असे अधिकारी उजल माथ्याने फिरतात असा आरोप देखील दानवे यांनी महेश आहेर यांच्यावर केला.

महिलांवर अत्याचार, व्यापाऱ्यांना धमक्या येत असून एकप्रकारे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा धिंडोरे निघत आहेत.

गुंडांना ठाण्यात सुरक्षा दिली जाते. पोलीस दलाचा वापर व्यक्तीगत केला जातो. याबाबत तपासणी केली पाहिजे अशी मागणीही दानवे यांनी केली.

पोलिसांची संख्या अतिशय कमी असताना पोलीस भरती केली जात नाही, प्रमोशन भरती यांकडे लक्ष द्यायला सरकारच वेळ नाही मात्र सरकार बदल्या मोठया आवडीने करत.

पोलिसांच्या बदल्यामध्ये व्यवहार चालतो. बदलीच्या नावाखाली एक बाजार उभा आहे अशा शब्दांत बदली प्रकरणी दानवे यांनी सरकारला सुनावले.

जानेवारी पर्यंत ३० ठिकाणी पोलिसांवर हल्ले झालेत. पोलिसांवर हल्ले करण्यास हिंमत येते कुठून असा सवाल करत त्यांना सत्ताधारी संरक्षण देतात हे दुर्दैव असल्याची खंत दानवे यांनी व्यक्त केली.
राजकीय गुन्हेगारीला संरक्षण देण्याचं काम भाजपच्या माध्यमातून आताच सरकार करत असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला.

एकीकडे विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींवर हल्ले केले जातात तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील गुन्हे करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाठीशी टाकले जाते असे म्हणत राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यस्थेवर दानवे यांनी सरकारला धारेवर धरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!