मुंबई : विधी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय बदलासाठी अर्ज करूनही प्रवेश मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे पसंतीच्या विधी महाविद्यालय व संस्था तीन आणि पाच वर्षाच्या प्रवेशापासून पात्र विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील प्रचलित शिक्षणपध्दतीनुसार कोणत्याही शाखेचे विद्यार्थी तीन वर्षाचा कायदेविषयक अभ्यासक्रम किंवा बारावी उत्तीर्ण होऊन पाच वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाला पसंती देतात. यंदाच्या वर्षी राज्यात विधी तीन आणि पाच वर्ष अभ्यासक्रमाचा निकाला उशिरा लागल्याने अनेक महाविद्यालयातील विधी शाखेतील जागा रिक्त आहेत. पहिल्या वर्षानंतर संस्था आणि महाविद्यालय बदलण्याबाबत उच्च शिक्षण संचालकाने परिपत्रक जारी केले होते विद्याथाँना अर्ज करण्यासाठी २६ ते ३० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु गुणपत्रिका नसल्यामुळे महाविद्यालय बदल करण्यासाठी विद्याथ्यांना अर्ज करता आला नाही.
विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी विद्याथ्याकडून करण्यात आली होती. मात्र अजूनही कार्यवाही न झाल्याने विद्याथ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्य सीईटी सेलचे आयुक्तांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
़़़़