रयत क्रांती विद्यार्थी संघटनेचे मुंबईमधील पहिले यश
मुंबई विद्यापीठाची लॉ ची परीक्षा पुढे ढकलली
डोंबिवली : रयत क्रांती विद्यार्थी संघटनेच्या दणक्यानंतर मुंबई विद्यापीठाची लॉ ची परीक्षा पुढे ढकलली आहे. रयत क्रांती विद्यार्थी संघटनेचे हे पहिले यश ठरले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाला टाळे ठोकत आंदोलन केले होते. तरीही प्रशासन दखल घेत नसल्याने रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते डॉ. विष्णू मगरे यांनी नवनियुक्त कुलगुरू यांना संपर्क साधला त्यानंतर विद्यार्थी संघटना भेटीला गेले. कृष्णा सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी चर्चा करण्यासाठी मा. कुलगुरू यांना भेटून आपल्या सर्व मागण्या समजावून सांगितल्या. त्यानंतर प्रकुलगुरू यांनी पुर्नमुल्यांकन होईपर्यंत लॉ च्या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट केलं,. रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार अॅड शार्दुल जाधव , युवा प्रदेश अध्यक्ष राहुल मोरे, प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र खोत यांच्या मार्गदर्शनाखाली रयत क्रांती विद्यार्थी संघटनेचे नेते कृष्णा सुर्यवंशी आणि सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला यश आले.