अपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री धावले
लातूर : औसा तालूक्यातील चलबुर्गा पाठीजवळ बस आणि ट्रक चा अपघाताची घटना समजताच जिल्हयाचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांची मदत केली. संबंधित यंत्रणांना कामाला लावले. यामुळे गंभीर जखमींना तातडीने उपचार मिळण्यास मदत झाली. पालकमंत्री यांचे धाकटे बंधू अरविंद पाटील निलंगेकर हे देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
पालकमंत्री संभाजी पाटील यांचा शनिवारी दुपारी औसा तालूक्यात नियोजित कार्यक्रम होता. ३ वाजण्याच्या सुमारास चलबुर्गा पाटीजवळ बस आणि ट्रक चा अपघात झाला. या भयंकर अपघातात अनेकजण जखमी झाल्याची तसेच मृत्यू पडल्याची बातमी पालकमंत्र्यांच्या कानी पडली हे ऐकताच ते तेथून तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्घर टनास्थळावरील अपघाताचे दृश्य पाहून पालकमंत्री ही सुन्न झाले. या प्रसंगात जखमीवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी घटनास्थळावरुनच त्यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. आरोग्य विभाग, रुग्णवाहिका, पोलिसयंत्रणा यांना सुचना करत जखमी रुग्णांना औसा आणि जवळच्या रुग्णालयात पोहचविण्याची व्यवस्था केली. खुद्द पालकमंत्री घटनास्थळावर पोहचल्याने जखमींना तातडीने उपचार मिळू शकले. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकले. पालकमंत्री संभाजी पाटील घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच त्यांचे धाकटे बंधू अरविद पाटील हे सुध्दा तेथे पोहोचले होते त्यांनीही पालकमंत्री तसेच अधिकार्यांनाही घटनेची माहिती देऊन मदत कार्यात मदत केली. यावेळी पालकमंत्र्यांसोबत खा.डॉ. सुनिल गायकवाड, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जि.प.चे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जि.प.चे कृषी सभापती बजरंग जाधव, अप्पर पोलिस अधिक्षक काकासाहेब डोळे, निलंग्याचे उपविभागीय अधिकारी रांजणकर, औश्याचे पोलिस उपअधिक्षक गणेश किंद्रे,, निलंग्याचे पोलिस निरीक्षक कल्याण सुपेकर, सुनिल उटगे, प्रविण कस्तुरे यांनीही घटनास्थळी अपघताग्रस्तांची मदत केली.