लतादिदींच्या नावाने आर्थिक फसवणूक : महिलेविरोधात गुन्हा
मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची खोटया सहीचा वापर करून एका महिलेने लाखो रूपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याप्रकरणी रेवती खरे या महिलेच्या विरोधात मुंबईतील गावदेवी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र खरे यांनी माझयाविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केला आहे.
गानकोकीळा लता मंगेशकर यांचे नाव वापरून एका महिलेने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुमचे नाव पाहून मी मदत केली, अशी माहिती एका महिलेने लतादीदींना दिली. ही बाब लतादीदींच्या लक्षात येताच त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी रेवती खरे या महिलेविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. रेवती खरे कोण आहे व काय करते याचा तपास पोलिस करत आहे.
