कल्याण/ : कल्याण डोंबिवली महापालिकेने भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा येथे क्वारंटाइन सेंटर तसेच संशयित आणि कोविड रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी उत्तम सुविधा असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी, प्रत्यक्षदर्शींच्या मते वस्तुस्थिती वेगळीच आहे. येथील असुविधांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता तर जेवणात चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. एका क्वारंटाइन व्हिडीओ द्वारे ही माहिती दिली आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा टाटा आमंत्रातील बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे. *****
