मुंबई : कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले. कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा पराभव झाला आहे.म्हात्रे यांना पहिल्या पसंतीची जवळपास २० हजार मते मिळाली आहेत. म्हात्रे यांच्या विजयासह भाजप आणि शिंदे गटाने विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला आहे.

कोंकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीतील मतमोजणीस नवी मुंबईतील आगरी कोळी हॉल येथे सुरुवात झाली. विभागीय आयुक्त तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, निवडणूक निरीक्षक विशाल सोलंकी यांच्यासह विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित


➡️ कोकण मतदार संघासाठी एकूण 98 मतदान केंद्रे होती.
➡️ आतापर्यंत मतपेट्या उघडण्याच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत.
➡️ तिसऱ्या फेरीत मतपेट्या उघडण्यात आल्या आहेत.

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची तब्बल ६ हजार मतांची आघाडी

म्हात्रे यांना पहिल्या पसंतीची १८ हजारांपेक्षा जास्त मतं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!