कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
मुंबई – प्रत्येकाचे पाल्य उच्चशिक्षत, उच्चविभूषित व्हायला हवा, अशी पालकांची धारणा असते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील शाळांतून मुलांना, शिक्षणासाठी शहरात नेले जाते. सध्या शहरी शिक्षणाचा कल वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर असून त्या वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन कोकण विभाग म्हादे परिवार संलग्न, कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र म्हादे यांनी व्यक्त केले. हनुमान जयंतीचे सप्ताहाचे औचित्य साधून वर्षाच्या अखेरच्या दिवशी खेड तालुक्यातील सुकीवली गावातील सुकीवली कुणबीवाडी शाळा क्र. २ या जिल्हा परिषदेच्या शाळातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
रविंद्र म्हादे म्हणाले की, शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे. प्रत्येकाने यामुळे शिकले पाहिजे. परंतु, सोशल मीडियाच्या युगात सध्या शिक्षणाकडे पालकवर्गाने विशेष लक्ष द्यायला हवे. आजकाल प्रत्येक पालकांना वाटते की, आपला पाल्य उच्चशिक्षित, उच्चविभूषित व्हावा. त्यासाठी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा सोडून शहरी शिक्षण पद्धती अणुकारली जात आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट प्रचंड घसरला असून भविष्यात या शाळा बंद पडतील की काय, अशी भीती कोकण विभाग म्हादे परिवार संलग्न, कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रविंद्र म्हादे यांनी व्यक्त केली. शिक्षणामुळेच पूर्ण जग पाहता येते. त्यामुळे प्रत्येक पालकांनी सध्याच्या युगाचा कानोसा घेऊन पाल्याच्या जडणघडणीवर भर द्यावा. मात्र या सर्वात जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन केले.
प्रतिष्ठानचे सेक्रेटरी काशिनाथ म्हादे यांनी परिवाराची उन्नती आणि भविष्याची व्याख्या विस्तृतपणे मांडली. तसेच आजवर प्रतिष्ठाणकडून शालेय मुलांसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. सध्याच्या युगात बदललेल्या मुलांच्या शिक्षण पध्दती, सोशल माध्यमाकडे वाढलेला कल या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून पालकांनी मुलांच्या संगोपनावर लक्ष द्यावे, असे आवाहन केले. आजच्या काळात शिक्षण का घेणे का महत्वाचे आहे, याबाबत ही मार्गदर्शन केले. शालेय शिक्षिका सीमाताई आंधळे यांनी आयोजक आणि नियंत्रकांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.
हनुमान मंदिरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक साहित्य पाहून सर्व चिंमुरड्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणीत झाला होता. दरम्यान, शाळेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा कोकणस्थ प्रतिष्ठाणच्या माध्यमातून भेट म्हणून देण्यात आला. शिंदे गटाचे खेड तालुक्यातील सचिव सचिन धाडवे, ग्रामपंचायत सदस्य परेश जाधव, रोशनी चाळके, बळीराम निकम, समीर राणीम, कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप म्हादे, उपाध्यक्ष संजय म्हादये, सेक्रेटरी आणि ईटीव्ही भारतचे वरिष्ठ पत्रकार काशिनाथ म्हादे, कार्याध्यक्ष विलास म्हादे, खजिनदार सत्यवान म्हादये, सदस्य रविंद्र म्हादे, उमेश म्हादे, दिलीप म्हादे, प्रसाद म्हादे, राजेंद्र म्हादे, संतोष म्हादे, प्रमुख सल्लागार समित म्हादे, रमेश म्हादे आदी संस्थेचे पदाधिकारी, शाळेच्या शिक्षिका सीमाताई आंधळे, कल्याणी शिंदे, अंगणवाडी मदतनीस सुप्रिया घाग, परिचारिका सारिखा घाणेकर, सुकीवली गावचे ग्रामस्थ आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.