मनसे नगरसेवक खरेदीचा व्यवहार हवालाच्या पैशातून
किरीट सोमय्यांची ईडीकडे चौकशीची मागणी
मुंबई : मनसेतील सहा नगरसेवकांना खरेदी करताना शिवसेना व त्या नगरेसवकांमध्ये पुष्पक बुलियनचे चंद्रकांत पटेल यांच्या हवाला ट्रान्झेक्शनद्वारे हा व्यवहार करण्यात आल्याची तक्रार भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी सेामवारी ईडीकडे केलीय. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पटेलला इडीने अटकही केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी खासदार सोमय्या यांनी ईडीकडे केलीय.
मनसेचे नगरसेवक विकत घेताना शिवसेनेने कोटयावधी रूपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप खासदार सोमय्या यांनी केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मनसे नगरसेवकांना प्रत्येकी ५ कोटी रूपये दिल्याचा आरेापही केल्याचे सोमय्या यांनी ईडीच्या तक्रारीत म्हणटल. या प्रकरणाची सगळी माहिती अॅण्टी करप्शन आणि इडीला देण्यात आली असल्याचे सोमय्यांनी स्पष्ट केलय. दरम्यान शुक्रवारी सोमयया यांनी पालिकेतील एका मोठ्या पक्षाकडून नगरसेवकांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असून, यासाठी या नगरसेवकांना कोट्यवधी रूपयांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याची तक्रार निवडणूक आयोग आणि कोकण महसूल विभागाकडे एका पत्राद्वारे केली हेाती. त्यावेळी सोमय्या यांनी ३ कोटी रूपये देऊन नगरसेवक विकत घेतल्याचा आरेापही शिवसेनेवर केला होता.
काय म्हणाले राज ठाकरे
मनसेतील सहा नगरसेवक फुटीनंतर रविवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शिवसेनेवर जहरी टीका केली. शिवसेनेच्या या नीच राजकारणाला कंटाळून मी शिवसेना सोडली. शिववसेनेने मदत मागितली असतीत तर दिली असती. त्यामुळे आता टाळी गालावर असा इशारा राज यांनी शिवसेना दिलाय. या प्रकरणामुळे ठाकरे बंधुमधील संघर्ष टोकाला पोहचल्याचे दिसून येतय.
काय म्हणाले उध्दव ठाकरे
मनसेचे नगरसेवक फेाडाफोडीनंतर किरीट सोमय्यांनी घोडेबाजार केल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करू नये अशी सनसनाटी चपराक सोमययांना लगावली होती. आमच बळ वाढल्याने भाजपच्या पेाटात मुरडा का येतोय, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
नेमकं प्रकरण काय
भांडूप पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील या विजयी झाल्या. भाजपने विजय मिळवल्यानंतर खासदार किरीट सोमय्या यांनी महापालिकेवर भाजपचा महापौर बसविण्याचे आव्हान शिवसेनेला दिले होते. पराभूत झालेल्या शिवसेनेने महापालिकेतील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी मनसेच्या अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी मतेकर, दिलीप लांडे, हर्षला मोरे आणि दत्ताराम नरवणकर या सहा नगरसेवकांना गळाला लावले.