ठाण्याच्या बी.एन. बांदोडकर महाविद्यालयात विविध स्पर्धा संपन्न

ठाणे : ठाण्याच्या बी.एन. बांदोडकर महाविद्यालयात अंतरभारतीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेत ७ खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेत सिंगल आणि डबल कॅरम स्पर्धेत ख़ुशी स्वर्ण ही विजेती ठरलेली आहे. तिला स्पर्धेत सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला.

ठाण्याच्या बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयाच्या वतीने वार्षिक क्रीडाच्या अनुषंगाने विविध ७ खेळांचे आयोजन केलेले होते. या स्पर्धेत १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. स्पर्धेत बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, धावणे, बॉक्स क्रिकेट, फुटबॉल आदींचा समावेश होता. सदरच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या वितरण संभारंभ ३ फेब्रुवारी, २०२४ रोजी संपन्न झाला.

या विविध स्पर्धेच्या संभारंभास सायकल विशेषज्ञ सतीश विष्णू जाधव हे राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग विजेते ठरलेले आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत फुटबॉल स्पर्धेत देव जदली. क्रिकेट मध्ये जयनीश कोळी, यांच्यासह सिंगल व डबल कॅरम स्पर्धेत ख़ुशी स्वर्ण हिने दोन गोल्ड पुरस्कार जिंकण्यात यश मिळवले. खुशीच्या या यशाने ठाण्यात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव ठाणेकरांद्वारे करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *