एकनाथ खडसेंची नाशिकच्या एसीबी कार्यालयात हजेरी
नाशिक : भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी सायंकाळी नाशिकमधल्या एसीबी कार्यालयात हजेरी लावली. खडसेंवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत त्यातल्या एखाद्या चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आल्याचं बोललं जात. मात्र गोपनीय तक्रारीच्या चौकशीचा भाग म्हणुन खडसेंना बोलावण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकनाथ खडसे हे तब्बल सव्वा तास लाचलुचपत विभागाचे अधिक्षक पंजाबराव उगले यांच्या केबिनमध्ये होते. मात्र खडसे हे माध्यमांशी न बोलताच निघून गेले.