मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद आणखीनच उफाळून आल्याचे दिसून येत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे. वेळ आल्यावर त्यावर भाष्य करेन, मी ज्यावेळी मुलाखत देईन तेव्हा भूकंप होईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना दिलाय . दरम्यान यावरून आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी एक ट्विट केलंय धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा साक्षीदार असूनही, इतके दिवस गप्प का बसलात? असा सवाल त्यांनी शिंदे यांना विचारलाय. माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल? असाही सवाल करीत केदार दिघे यांनी एकनाथ शिंदेना कोंडीत पकडलय.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही रात्र दिवस शिवसेनेसाठी काम केले. आम्ही आमच्या कुटुंबाला वेळ दिला नाही. या मेहनतीतून शिवसेना उभी राहिली आहे धर्मवीर सिनेमा काहीना रुचला नाही. पचला नाही. मी आज काही बोलणार नाही मात्र समोरून जसजसे तोंड उघडेल मग मलाही बोलावे लागेल.ज्या मुलाखतीचा सपाटा सुरू आहे त्यावर बोलणार नाही. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्या दिवशी भूकंप होईल असे शिंदे म्हणाले. मात्र यावरून आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केल्याने शिंदे काय उत्तर देतात याकड लक्ष वेधले असून, शिंदे खरोखरच गुरु आनंद दिघे यांच्या बाबतीत काय घडलं याचा गौप्य स्फोट करणार अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.