कल्याण : केपटाऊन शहरातून ,डोंबिवली शहरात परतलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहप्रवासी आणि त्याचे तीन निकटचे नातेवाईक यांची rt-pcr टेस्ट निगेटिव्ह आली आहे अशी माहिती महापालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली असतानाच डोंबिवलीतही दक्षिण आफ्रिकेवरुन परतलेल्या प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला हेाता. या रूग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते. दरम्यान आरटी पीसीआर चाचणीद्वारहे ओमायक्रॉन व्हायरस ओळखला जातो मात्र ही चाचणी निगेटिव्ह आलीय.
ओमायक्रॉन विषाणूचा परदेशात झपाट्याने होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात At risk देशातून म्हणजेच युके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोटस्वाना, चीन, मॉरिशस, न्युझीलंड, झिम्बॉबे सिंगापूर, हाँगकाँग, इस्त्रायल या व शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या इतर At risk (अति जोखमीच्या) देशातून आलेल्या सर्व नागरिकांनी भारतात परतल्यानंतर RT-PCR चाचणी करणे अनिवार्य आहे. RT-PCR चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तर अशा लोकांना 7 दिवस घरी विलगीकरणात राहायचे आहे व 8 दिवसांनी पुन्हा तपासणी करायची आहे आणि त्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला तर पुढील 7 दिवस आपल्या तब्येतीवर लक्ष ठेवायचे आहे.
परंतू अशा रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांना महानगरपालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल व्हावे लागणार आहे. त्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविण्यात येईल व त्यातुन प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार पुढील उपचाराची रुपरेषा निश्चीत केली जाईल. यामधून 5 वर्षाखालील मुलांना वगळण्यात येत आहे, परंतू जर त्यांना कोविड सदृश्य लक्षणे असतील तर मात्र त्यांची RT-PCR Test करणे अनिवार्य राहील.
परदेशातील काही देशात ओमायक्रॉन या नविन व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव पाहता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. नायजेरीया या देशातून काही दिवसापूर्वी भारतात आलेल्या नागरिकांची माहिती मिळताच महापालिकेने त्यांची RT-PCR चाचणी केली असता ती निगेटिव्ह आढळून आली, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. या नविन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या 10 दिवसात परदेशातून भारतात आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती महापालिकेस कळवावी त्याचप्रमाणे स्वत:ची आरटीपीसीआर टेस्ट महानगरपालिकेच्या Testing Centre मधून करुन घ्यावी, तसेच महापालिका क्षेत्रातील गृहनिर्माण सोसायटयांनी देखील आपल्या गृहसंकुलात गेल्या 10 दिवसात परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास किंवा नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रास कळवावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
त्या रूग्णांची चाचणी निगेटिव्ह …