प्रभाग क्षेत्र अधिका-याला कारणे दाखवा नोटीस
अनधिकृत बांधकाम प्रकरण : नगरसेवकावरील गुन्हा मागे का घेतला ?डोंबिवली (प्रतिनिधी) : एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याच्या प्रकरणात दोन नगरसेवकावर दाखल केलेला गुन्हा कोणत्या कारणामुळे मागे घेतला या संदर्भात पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी पालिकेतील ई प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांच्याकडून खुलासा मागविला असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे प्रकरण पून्हा एकदा चर्चेत सापडले असून, हे दोन्ही नगरसेवक वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे.

डोंबिवली पूर्वेतील नांदिवली रोड येथील अनधिकृत टी के धाबा यावर निष्कासनाची कारवाई करताना भाजप नगरसेवक शैलेश धात्रक आणि मनसे नगरसेवक मंदार हळबे यांनी अडथळा आणून आपले अपहरण करण्याचा प्रयत्न केला व जातीवाचक शिवीगाळ केली असा आरोप करून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासनाने चौकशी समिती गठीत केली आहे. मात्र सदर प्रकरणात आपण उभयपक्षीयांमध्ये २४ ऑक्टोबर २०१८ रोजी समजुतीचा करार केल्याने सात दिवसात खुलासा सादर करावा असे आयुक्तांनी भांगरे यांना दिलेल्या नोटीशीत म्हटले आहे. विहित मुदतीत खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. डोंबिवलीतील माहिती अधिकारी कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी याप्रकरणी पालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगानेच आयुक्तांनी ही नोटीस बजावली आहे.
————-
————-